Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पा मोरया! भक्तीमय वातावरणात गणरायाचे घराघरात आगमन, गणेशभक्तांमध्ये उत्साह, COVID-19 महामारी विघ्न दूर करण्यासाठी साकडं

(Ganpati Bappa Morya), ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे..’ अशा एक ना अनेक घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नगर्ता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे आज घराघरात आगमन झाले.

Ganpati Bappa Morya | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

गणपती बाप्पा मोरया.. (Ganpati Bappa Morya), ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे..’ अशा एक ना अनेक घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नगर्ता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे आज घराघरात आगमन झाले. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) असल्याने आज दिवसभर विविध ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापणा केली जाईल. कोरोना व्हायरस महामारी सारखे संकट कायम असतानाही गणेशभक्तांचा उत्साह उल्लेखनीय असल्याचे पाहायला मिळाते आहे. राज्य सरकारने जारी केलेली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत गणेशभक्तांनी घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापणा केली आहे. घराघरांमध्ये भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होता. महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गणेशोत्सव काळात गणेश दर्शनासाठी लाखोंची गर्दी होते. मात्र पाठीमागील वर्षी कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. परिणामी वर्षभरात कोणतेही सण जाहीरपणे साजरे करता आले नाहीत. यंदाही गणेशोत्सवांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्याचे पाहायला मिळते आहे. कोरोना व्हायरसची संभाव्य लाट टाळण्यासाठी राज्य सरकार कसोशिने प्रयत्न करत आहे. त्यामुळे सरकारने गणेश मंडळांना अत्यंत कठोर नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावे लागणार आहे. मंडळांनीही ही तयारी दर्शवली आहे. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2021 Wishes: पंतप्रधान Narendra Modi ते Sharad Pawar यांच्याकडून गणेश चतुर्थीच्या भक्तांना शुभेच्छा)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अशी ओळख असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, नाशिक यांसह इतरही अनेक शहरं आणि ग्रामीण भागांमध्ये गणरायाला घरी आणण्यासाठी अबलवृद्धांची लगबग पाहायला मिळाली. मुंबईमध्ये जी काही प्रमुख गणेश मंडळे आहेत. जे मानाचे गणपती म्हणून ओळखले जातात त्या मंडळांनी आपल्या अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गणेश पूजा पार पाडून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली.

ट्विट

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त शहर ते गाव आणि गाव ते शहर असा प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कोरोना व्हायरस महामारिचा धोका विचारात घेऊन सार्वजनिक आणि गर्दी जमणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. हे आदेश 19 फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत.