Three Girls Drown in Gadchiroli: गडचिरोलीत एकच खळबळ, वैनगंगा नदीत नाव उलटल्याने 3 मुलींचा बुडून मृत्यू
ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. या तिन्ही मुली गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या चामोर्शी (Chamorshi) तालुक्यातील रहिवाशी आहेत.
वैंनगंगा नदीत (Wainganga River) 3 अल्पवयीन मुलींचा पाण्यात बडून मृत्यू झाल्याची धक्कादाक महिती समोर आली आहे. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. या तिन्ही मुली गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या चामोर्शी (Chamorshi) तालुक्यातील रहिवाशी आहेत. या मुली नावेत बसून नदी पार करीत असताना अचानक त्यांचा तोल सुटला. ज्यामुळे त्या तिघीही मुली नावेतून खाली पाण्यात पडल्या. या मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अस्कमित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनी मुकरू शेंडे (वय, 14), समृद्धी ढिवरू शेंडे (वय, 15) आणि पल्लवी रमेश भोयर (वय, 13) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या तिघीही वैंनगंगा नदीच्या पात्रात नावेत बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्यासाठी जात होत्या. मात्र, अचानक त्यांचा तोड गेला. ज्यामुळे त्या नदीत पडल्या. महत्वाचे म्हणजे, या तिघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा नदीत बुडून मृ्त्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. हे देखील वाचा- Nagpur: नागपूर येथील एका अल्पवयीन नातीने स्वतःच्याच आजीचा चिरला गळा, हत्येमागील कारण ऐकून पोलीसही चक्रावले
वैंनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नसून अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे. या घटनेनंतर तिन्ही मुलींच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. लोकसत्ताने या संदर्भात वृत्त दिले आहे.