अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू; महाराष्ट्र बोर्डाचे 10, 12 वीचे निकाल लवकरच mahresult.nic.in होणार जाहीर

यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तीन फेर्‍यांमध्ये पार पडणार आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

FYJC Online Admissions 2019-20: महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. येत्या आठवड्याभरात एचएससी आणि एसएससीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र आज (27 मे) पासून अकरावी म्हणजेच एफवायजीसीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डाकडून देण्यात आलेले माहिती पुस्तक, सोबत लॉग ईन आयडी देण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्याचे प्राधान्यक्रम ठरवायचे आहेत. महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

मुंबई, पुणे, चिंचवड या भागामधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी दोन भाग आहेत. त्यापैकी पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांना त्यांची वैयक्तित माहिती भरणं अनिवार्य आहे. शक्यतो ही माहिती शाळा किंवा संबंधित मार्गदर्शन केंद्राद्वारा भरणं अधिक सुकर होणार आहे. पहिला टप्पा योग्य आणि संपूर्ण भरल्यानंतरच दुसरा भाग भरण्याची मुभा मिळणार आहे. म्हणूनच पहिल्या भागाचे स्टेटस योग्यरित्या भरा. Maharashtra Board SSC HSC Results 2019: 12,10 वीचा निकाल लवकरच; मेडिकल, इंजिनियरिंग ते FYJC अ‍ॅडमिशन साठी राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तीन फेर्‍यांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये सामाजिक आरक्षण, सवर्ण आरक्षण, मॅनेजमेंट कोटा, संस्थांतर्गत कोटा अशा विविध कोट्याचा विचार करून प्रवेशप्रक्रिया पार पडणार आहे.

मराठा विद्यार्थ्यांना यंदापासून शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे. जात प्रमाणपत्र नसलेल्या मराठा विद्यार्थ्यांना पालकांचे हमीपत्र देण्याची मुभा प्रवेश समितीने दिली आहे. विद्यार्थ्यांना किमान 1 ते कमाल 10 महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरता येणार आहेत.