FYJC Admissions 2020 Special Round Schedule: 11 वी प्रवेश प्रकियेसाठी आजपासून विशेष फेरीचं आयोजन; इथे पहा वेळापत्रक

त्याची पहिली यादी 24 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

अकरावी प्रवेश  प्रक्रियेसाठी (FYJC Admissions) 3 नियमित फेर्‍या पार पडल्यानंतरही 70 हजाराहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देऊन यंदाच्या वर्षाचा अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी 2 विशेष प्रवेश प्रक्रिया फेर्‍या पार पडणार आहेत. या विशेष प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी आज (20 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. यंदा सुरूवातीला कोरोना संकट आणि नंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने थांबलेली 11वी ची प्रवेश प्रक्रिया यामुळे एफवायजीसी ची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

कशी असेल विशेष प्रवेश प्रकिया फेरीचं आयोजन?

20 डिसेंबर 2020 - कॉलेजमधील रिक्त जागा जाहीर होतील.

20-22 डिसेंबर 2020 - विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जात बदल करून कॉलेजचा पसंतीक्रम बदलण्याची संधी

24 डिसेंबर 2020 - सकाळी 11 वाजता प्रवेश यादी जाहीर होणार

24-26 डिसेंबर 2020 - पहिल्या विशेष प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याची संधी

27 डिसेंबर - उर्वरित रिक्त जागा जाहीर होतील.

यंदा वाणिज्य अर्थात कॉमर्स साठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या शाखेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान कॅप कमिटीकडून विद्यार्थयंना त्यांचे अ‍ॅडशिमन रद्द करण्याची ही शेवटची संधी असल्याचं सांगण्यात आले आहे. यानंतर अ‍ॅडमिशन रद्द केले जाऊ शकत नाही. FYJC Online Admission Process 2020-21 New Time Table: 11वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया 26 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू; 11thadmission.org.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक.

दरम्यान यापूर्वी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची कॉलेजेस जनेवारी 2021 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही 9-12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याला मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुभा दिली आहे.  ऑफलाईन वर्ग सुरू करण्याकरिता पालकांचे हमीपत्र सादर करावं लागणार आहे.