Ajit Pawar Next CM Poster: भावी मुख्यमंत्री अजित पवार! पुण्यापाठोपाठ मुंबईतील मलबार हिल परिसरात झळकले पोस्टर (Watch Video)

यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे दर्शवणारे पोस्टर दिसले होते.

Ajit Pawar Next CM Poster (फोटो सौजन्य - X/@fpjindia)

Ajit Pawar Next CM Poster: शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Elections 2024 Results) समोर आला. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. महायुतीच्या निर्णायक विजयानंतर अवघ्या एका दिवसानंतर रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना 'भावी मुख्यमंत्री' (Future Chief Minister Ajit Pawar) म्हणून घोषित करणारे पोस्टर त्यांच्या मुंबईतील मलबार हिल (Malabar Hill) येथील निवासस्थानाजवळ पाहायला मिळाले. यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी पुण्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे दर्शवणारे पोस्टर दिसले होते. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील पोस्टर राष्ट्रवादी काँग्रेस नेते संतोष नांगरे यांनी लावले होते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनीत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अजित पवार यांची विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. अनिल पाटील यांची पक्षाचे मुख्य व्हीप म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली, त्यांना आमदारांची उपस्थिती सुनिश्चित करणे आणि सत्रांमध्ये त्यांचा सहभाग समन्वयित करण्याचे काम देण्यात आले. भाजप आणि शिवसेनेसोबतच्या महायुतीच्या युतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत 59 जागांपैकी 41 जागा जिंकल्या. महायुतीने 288 पैकी 233 जागा मिळवून बहुमत सिद्ध केले. (हेही वाचा -Ajit Pawar as CM? निकालाआधीच निकाल; अजित पवार मुख्यमंत्री! अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी)

भावी मुख्यमंत्री अजित पवार! मलबार हिल परिसरात झळकले पोस्टर -

अजित पवार यांनी महायुतीत आपले स्थान भक्कम केले आहे. लोकसभा निवडणुकीत चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. परंतु, सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, असे असले तरी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांनी आपला विजयश्री खेचून आणला. अजित पवारांनी एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पुतण्या युगेंद्र पवार यांचा पराभव केला.