पेट्रोल प्रतिलीटर @९२.१९ ₹, तर डिझेल @८२.८९ ₹;राज्यातील महागाईत मॅरेथॉन वाढ
येथे पेट्रोल चक्क प्रतिलीटर ९२.१९ पैशांवर पोहोचले आहे. तर, परभणीत ९१.२२ असा पेट्रोलचा दर आहे. जाणून घ्या राज्यभरात कोणत्या शहरात पेट्रोल, डिझेलचे दर आहेत चढे.
मुंबई: राज्यभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. हे दर प्रतिदिन वाढीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. इंधनातील दरवाढ आणि पर्यायाने महागाईत होणारी मॅरेथॉन वाढ पाहून जनता मात्र हैराण झाली आहे. राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात तर कहरच झाला. येथे पेट्रोल चक्क प्रतिलीटर ९२.१९ पैशांवर पोहोचले आहे. तर, परभणीत ९१.२२ असा पेट्रोलचा दर आहे. जाणून घ्या राज्यभरात कोणत्या शहरात पेट्रोल, डिझेलचे दर आहेत चढे.
मुंबई - पेट्रोल -८९.४४ रुपटे, डिझेल - ७८.३३ रुपये
नांदेड शहर - पेट्रल ९१.००, डिझेल ७८.६५
नांदेड जिल्हा (धर्माबाद तालुका ) - पेट्रोल ९२.१९, डिझेल - ८२.८९
नांदेड तालुका (उमरी तालुका) - पेट्रोल ९१.८९, डिझेल ७९.४९
पेट्रोलने दराची नव्वदी पार केलेली शहरे
परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जालना, जळगाव, हिंगोली, गोंदिया, बुलढाणा, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी
पेट्रोल,डिझेलचे दर प्रतिदिन वाढत आहेत. आजही पेट्रोलचे दर १५ पैशांनी तर, डिझेल ७ पैशांनी वाढले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८९,४४ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर, डिझेल ७८.३३ रुपये प्रिती लिटर दराने. हे दर भविष्यातही असेच वाढत राहिले तर, ते कोणती पातळी गाठतील हे सांगता येत नाही.