Dombivli Shocker: सिगारेट आणण्यास नकार दिल्याने मित्राची हत्या, एकास अटक

4 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेसाठी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे रामनगर पोलीस ठाण्यातील (Ramnagar Police Station) एका अधिकाऱ्याने सांगितले.

Murder | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली (Dombivli) शहरात मित्राने सिगारेट (Cigarettes) आणण्यास नकार दिल्याने एका 32 वर्षीय व्यक्तीला त्याच्या मित्राची हत्या (Murder) केल्याप्रकरणी अटक (Arrested) करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. 4 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेसाठी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे रामनगर पोलीस ठाण्यातील (Ramnagar Police Station) एका अधिकाऱ्याने सांगितले.

4 नोव्हेंबरच्या रात्री पीडित जयेश जाधव हा आरोपी आणि इतर काही मित्रांसोबत पार्टी करत होता. नंतर घरी जाण्यासाठी निघून गेला. त्याच्या घराजवळ पोहोचल्यावर आरोपीने पीडितला काही सिगारेट आणण्यास सांगितले, ज्याला पीडितने नकार दिला. हेही वाचा Crime: धक्कादायक ! मोबाईल देण्याच्या बहाण्याने शिक्षकाकडून 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

आरोपीने पीडितच्या डोक्यावर वार करून जखमी केले. पीडित डोक्याला दुखापत घेऊन घरी परतला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असेही ते म्हणाले.