Nashik Accident: नाशिक येथे कार-मोटरसायकलच्या धडकेत अपघात, चार ठार, एक जखमी
नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी रोडवर शुक्रवारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Nashik Accident: नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी रोडवर शुक्रवारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. कार आणि बाईकच्या धडकेत हा भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारच्या दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. (हेही वाचा- भिवंडी मध्ये रिक्षा डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू; 3 जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, बाईकने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावर उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. बाईक आणि कारच्या धडकेत अपघात घडून आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.
स्थानिक नागिरकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत आणि जखमी लोकांच्या कुटुंबियाना घटनेची माहिती देण्यात आली. घोटी पोलिस ठाण्यात या प्रकरणी घटनेची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातामुळे अक्षर: कारचा चेंदामेदा झाला आहे. पोलिसांनी रस्त्यावर झालेल्या वाहतुक सेवा सुरळीत केली आहे. दरम्यान काल बुलढाणा येथे कार आणि टेम्पोच्या धडकेत अपघात झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on Mar 09, 2024 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

