Chandrapur Farmer Death: विजेच्या तारेचा स्पर्श होऊन चंद्रपूरमध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

या घटनेत एक शेतकरी बचावला असून त्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे.

Indian Farmers | (Photo Credit - Twitter)

Chandrapur Farmers Death: चंद्रपूरमधून अतिशय दु:खद घटना समोर येत आहे. शेतात खतांची फवारणी करताना विजेच्या तुटलेल्या तारेला(Electric Wire) स्पर्श झाल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला (Chandrapur Farmer)आहे. या घटनेत एक शेतकरी बचावला असून त्या शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. घरांचे नुकसान झाले आहे. शेकडो जनावरे दगावली आहेत. (हेही वाचा:Chhatrapati Sambhajinagar: कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना )

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज झिंगरे, पुंडलिक मानकर अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तर एक शेतकरी जखमी झाला आहे. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व शेतकरी प्रकाश राऊत यांच्या शेतामध्ये पिकाला फवारणी करण्यासाठी आले होते. याचवेळी विजेच्या तुटलेल्या तारेला त्यांचा स्पर्श झाला. स्पर्श होताच पाचही जण जागेवर कोसळले. शेतमालक प्रकाश राऊत यांच्यासह चौघांचा यात मृत्यू झाला, तर एक जखमी झाला.