चार दारुड्या तरुणींचा पोलिसांवर हल्ला; कॅमेऱ्यात घटना कैद

तर, इतर तिघी मीरा रोड येथे राहतात. पोलिसांनी या चौघींविरोधात कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या तळीराम तरुणींनी चक्क पोलिसांवरच हात उगारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर येथे ही घटना घडली. या घटनेत चार तरुणींचा समावेश असून, पोलिसांनी त्यापैकी तिघींना अटक केली आहे. तर, चौथी तरुणी पसार झाली आहे. पोलीस त्या तरुणीचा शोध घेत आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या चारही तरुणी भाईंदर इथल्या मैदानात गोंधळ घालत होत्या. पोलीस त्या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अचानक या चारही जणींनी चक्क पोलिसांवरच हात उगारला. या प्रकारानंतर आजकाल केवळ मद्यधुंद तरुणच नव्हे तर, तरुणींच्या असभ्य वर्तनातही मोठी वाढ झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ममता मेहर (२५), आलिशा पिल्लाई (२३), कमल श्रीवास्तव (२२) आणि जस्सी डिकोस्टा (२२) अशी या चार तरुणींची नावे आहे. पोलिसांनी या चारही जणींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत माहिती अशी, या चार तरुणी मीरारोड येथे पार्टी करुन घरी परतत होत्या. दरम्यान, रात्री दोनच्या सुमारास त्या भाईंदर येथील शहीद भगतसिंग मैदानात आल्या. या मैदानात तिघिंचे आपापसात कडाक्याचे भांडण सुरु झाले. अर्वाच्च शिव्या आणि आरडाओरडा यामुळे येथे गर्दी जमा झाली. दरम्यान, गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले तीन पोलीस घटनास्थळी पोहोचले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांचाही समावेश होता. दरम्यान, चौघींपैकी एक असलेली डिकोस्टा नालासोपारा येथे राहते. तर, इतर तिघी मीरा रोड येथे राहतात. पोलिसांनी या चौघींविरोधात कलम ३५३, ३३२ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या चारही तरुणींना शांत करण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी शिवीगाळ करत उलट पोलिसांवरच हात उचलला. गर्दीमधील काहींनी या प्रकाराचे मोबाईलद्वारे व्हिडिओ शुटींगही केले. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

CM Eknath Shinde On Onion Price: कांद्याच्या वाढत्या किमतीवर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली चिंता; साठेबाजी करणाऱ्यांवर दिले कडक कारवाईचे निर्देश

Maharashtra Weather Forecast: राज्यात चक्रीवादळाचा प्रभाव! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Maharashtra Assembly Elections 2024: निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक बातमीवर निवडणूक आयोग ठेवणार लक्ष; माध्यम देखरेख व संनियंत्रण कक्ष कार्यरत

Amit Shah's Bag Check By EC: निवडणूक अधिकाऱ्यांकडून हिंगोलीत अमित शहा यांच्या बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ