IPL Auction 2025 Live

Abaji Patil Passes Away: माजी आमदार आबाजी पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन; वयाच्या 94 वर्षी घेतला अखेरचा श्वास

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्याचे माजी अमदार आबाजी नाना पाटील (Abaji Patil Passes Away) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Abaji Patil Passes Away (Photo Credit: Facebook)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) तालुक्याचे माजी अमदार आबाजी नाना पाटील (Abaji Patil Passes Away) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आबाजी पाटील हे 94 वर्षाचे होते. त्यांचे मंगळवारी रात्री शहापूर तालुका जामनेर येथील मूळगावी निधन झाले आहेत. यांच्या निधनाबाबत अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आबाजी पाटील यांना अण्णासाहेब या नावाने ओळखले जात होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय होते. तसेच त्यांच्या कामाच नेहमी कौतूक केले जात आहे.

आबाजी पाटील हे 1962 साली जामनेर तालुक्यातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर सलग दहा वर्ष त्यांनी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांच्या आमदारीरकीच्या पहिल्या कारकिर्दीत जामनेरला विज पुरवठ्यास सुरुवात झाली होती. एवढच नव्हेतर त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांनी तब्बल 40 वर्षे राजमल तालुका शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी संभाळली. सहकारी तत्वावरील पहिल्या रम प्रकल्पाचे ते संस्थापक अध्यक्ष होते.