Badlapur School Case: बदलापूरतील आदर्श शाळा बलात्कार प्रकरणावर शिवसेना नेते वामन म्हात्रे यांची वादग्रस्त टिप्पणी

पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Waman Mhatre (Pic Credit - Facebook )

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर आदर्श विद्यालयात (Adarsh School Badlapur)  लैंगिक अत्याचार (Badlapur Crime) झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळला जातो आहे. त्याचप्रमाणे बदलापूरमधले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशी द्या अशी मागणी होते आहे. या प्रकरणावरुन आता राजकारण देखील तापू लागले आहे.  एका महिला पत्रकाराने शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या एका महिला बातमीदारावर आगपाखड केली आहे. (हेही वाचा - Badlapur School Case: बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची नियुक्ती; नराधमांना तात्काळ शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची फडणवीसांची माहिती)

अशाप्रकारची भाषा वापरणाऱ्या म्हात्रे यांचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून जिल्ह्यातील पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील आहेत. पण तुमच्या ठाणे जिल्ह्यात तुमच्याच पक्षातील राजकारणी मंडळी जर असे वागत असतील तर दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले.

याप्रकरणी आज सकाळी साडे सहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif