IPL Auction 2025 Live

Thane Shocker: माजी नगराध्यक्ष गणेश साळवी यांच्या भावाने पत्नीवर झाडल्या गोळी; नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने दिलीप साळवी यांचा मृत्यू

दिलीप हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असून ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू होते.

Gun Shot | Pixabay.com

Thane Shocker: ठाण्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय नेते गणेश साळवी (Ganesh Salvi) यांचा भाऊ दिलीप साळवी (Dilip Salvi) यांनी वैयक्तिक शस्त्राचा वापर करून त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. त्यानंतर शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कळव्यातील मनीषा नगर येथील नॅशनल हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना घडली. दिलीप हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असून ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे मोठे बंधू होते.

दिलीपने आधी पत्नी प्रमिलावर तिच्या घरी गोळ्या झाडल्या आणि नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या दाम्पत्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की दिलीपने एवढं टोकाचं पाऊल उचललं. (हेही वाचा -Jalna Maratha Reservation Protest: अंबड येथे मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, शासनाकडून चौकशीचे आदेश (Watch Video)

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले आहेत.

दिलीपच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नसून वैद्यकीय प्रक्रियेनंतर ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे कळवा परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.