मुंबईचे माजी महापौर नाना चुडासामा यांचे राहत्या घरी निधन
नाना चुडासामा यांना 2005साली सामाजकार्यातील भरीव कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक, माजी नगरपाल, महापौर नाना चुडासामा (Nana Chudasama) यांचे वयाच्या 84 व्या वर्षी आज राहत्या घरी निधन झाले. नाना चुडासामा हे भाजपा प्रवकत्या शायना एन सी (Shaina NC) यांचे वडील होते. I Love Mumbai ही एनजीओ त्यांनी सुरु केली होती. राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये नाना चुडासामा हे त्याच्या विनोदी बुद्धीसाठी ओळखले जात असे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गोष्टींवर कमीत कमी शब्दांत ते चपखल भाष्य करत असे.
नाना चुडासामा यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शालेय मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नाना चुडासामा यांना 2005साली सामाजकार्यातील भरीव कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं.