Deepak Sawant Car Accident: माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या वाहनाला अपघात, मान आणि पाठिला दुखापत; रुग्णालयात उपचार सुरु
दीपक सावंत यांच्या वाहनाला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर . सावंत यांना रुग्णवाहिकेद्वारे अंधेरी येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी (20 जानेवारी) सकाळी पालघरच्या दिशेने निघाले असताना काशिमीरा परिसरात ही घटना घडली.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या वाहनाला अपघात (Deepak Sawant Car Accident) झाला आहे. या अपघातात डॉ. दीपक सावंत जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (20 जानेवारी) सकाळी पालघरच्या दिशेने निघाले असताना काशिमीरा परिसरात ही घटना घडली. डॉ. दीपक सावंत यांच्या वाहनाला डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर डॉ. सावंत यांना रुग्णवाहिकेद्वारे अंधेरी येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. दीपक सावंत यांच्या वाहनाला पाठिमागून धडक देणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातामध्ये दीपक सावंत यांची कार पाठिमागच्या बाजूने अक्षरश: दामटून गेली. अपघातानंतर पुढच्या काहीच मिनिटांमध्ये सावंत यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?)
दरम्यान, पाठिमागील काही दिवसांपासून राजीकय नेत्यांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्य नागरिक तर किरकोळ अपघातामुळेही मृत्यू पावत असल्याचे वास्तव आहे. कालच (19 जानेवारी) मुंबई गोवा हायवेवर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांचे अपघातही वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यानंतर बच्चू कडू यांच्याही वाहनाला अपघात झाला. धनंजय मुंडे यांच्याही वाहनाला अलिकडेच अपघात झाला. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.