काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची यवतमाळ, आर्वी येथे उद्या सभा
ही चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल झाले. कालच (13 ऑक्टोबर 2019) त्यांनी मुंबई येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या सभेला
Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी ते दोन ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. यातील पहिली सभा ते यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील वणी (Wani) येथे घेतील. तर दुसरी सभा वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी (Arvi) येथे घेणार आहेत. दोन्ही सभा अनुक्रमे दुपारी 2 आणि दुपारी 3.40 मिनीटांनी सुरु होणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, उद्या दुपारी 1 वाजता राहुल गांधी यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते आपल्या पुढील कार्यक्रमास रवाना होतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रणधुमाळी आता हळूहळू अंतिम क्षणांकडे निघाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून राजकीय पक्षांनी प्रचारसभा, पदयात्रा, कोपरा सभा आदींवर भर दिला आहे.
भाजप शिवसेना युतीचे पैलवान निवडणुकीच्या आखाड्यात उभे आहेत. परंतू, विरोधी पक्षांकडे पैलवानच नाहीत त्यामुळे सामना एकतर्फी जिंकल्याचा दावा भाजपकडून केला जात होता. भाजपच्या दाव्यांना आणि टिकेला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार हे आव्हन देत होते. मात्र, काँग्रेस पक्षातून अद्याप तसा दमदार चेहरा पुढे येत नव्हता. अशातच भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांच्या फौजा महाराष्ट्रात भाजप प्रचारासाठी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीर काँग्रेस पक्षाकडून कोणताच केंद्रीय नेता महाराष्ट्रात दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. (हेही वाचा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभाराचा ना काँग्रेसला फायदा झाला न महाराष्ट्राला: राज ठाकरे)
दरम्यान, काँग्रेसकडून कोणता नेता निवडणूक प्रचरासाठी महाराष्ट्रात येणार, गांधी कुटुंबियांतील कोण व्यक्ती येणार का याबाबत उत्सुकता होती. ही चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल झाले. कालच (13 ऑक्टोबर 2019) त्यांनी मुंबई येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांच्या सभेला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अविनाश पांडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नसिम खान, वर्षां गायकवाड, प्रिया दत्त व काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.