Manohar Joshi Passed Away: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच निधन, हिंदूजा रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास
त्यांना दोन दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.
Manohar Joshi Passed Away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर (Manohar Joshi) जोषी यांचं निधन झालं आहे. त्याच्या निधनाची माहिती समजताच राजकिय क्षेत्राच शोककळा पसरली. मनोहर जोशी यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले. त्यांना दोन दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे त्यांना रुग्णालयात ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. वयाच्या 87 वी वर्षी मनोहर जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. (हेही वाचा- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर यांची प्रकृती गंभीर)
मीडिया रिपोर्टनुसार, 21 फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मुंबईतील हिंदूजा रुग्णालायत उपचार सुरु होते. ते आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. मनोहर जोशी यांच्या निधनाची माहिती समजताच, राज्यात शोककळा पसरली. आज त्यांच्यावर मुंबई दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजकिय कामकाजापासून दूर होते.
मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अश्या विविध पदांवर कामगिरि केली आहे. राजकारण देखील मनोहर जोशी यांनी नाव कोरलं आहे. 1995 रोजी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री होते.