Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! गेल्या 4 दिवसांत दुसऱ्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण नाही
शुक्रवारी मुंबई शहरात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण समोर आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
Mumbai Corona Update: मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिकेला (BMC) यश आले आहे. सुमारे अडीच वर्षांनंतर एकही कोरोनाबाधित रुग्ण समोर आलेला नाही. शुक्रवारी मुंबई शहरात कोरोनाचा (Coronavirus) एकही नवीन रुग्ण समोर आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मार्च 2020 मध्ये कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती.
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली होती, तर कोरोनामुळे मृत्यूचा आकडा दररोज 100 वर पोहोचला होता. कोरोना टाळण्यासाठी राज्य सरकार आणि बीएमसीने शहरात अनेक नियम लागू केले होते. या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्यानंतर मुंबई कोरोनाच्या तिन्ही लाटांचा सामना करण्यात यशस्वी ठरली आहे. मुंबईत कोरोनाच्या तीनही लाटा आल्या होत्या. तसेच ओमिक्रॉन बीएफ 7, एक्सबीबी, एक्सबीबी 1.5 असे नवीन प्रकारही मुंबईत दाखल झाले होते. (हेही वाचा -iNCOVACC Vaccine: प्रजासत्ताक दिनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी एक शस्त्र तयार; पहिली नाकावाटे देण्यात येणारी 'इन्कोव्हॅक' लस लाँच)
बीएमसीच्या बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, शुक्रवारी मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आता शहरातील कोरोनाचे एकूण रुग्ण 11,55,242 झाले आहेत. बीएमसीच्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसण्याची ही शहरात दुसरी वेळ आहे. (हेही वाचा - COVID-19 रोखण्यासाठी Novel Spray करणार मदत; फुफ्फुसांत संसर्ग होण्याचा धोका टळणार)
दरम्यान, मार्च 2020 मध्ये साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर 24 जानेवारी रोजी मुंबईत प्रथमच कोरोनाचे शून्य प्रकरणे नोंदवली गेली. मात्र, बीएमसीने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव टळला आहे. शुक्रवारी शून्य रुग्ण पुढे आले होते. मुंबई शहरातील रुग्णांची संख्या 11 लाख 55 हजार 242 वर स्थिर आहे. मुंबईत कोरोनामुळे 19 हजार 747 जणांचा मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार, सध्या शहरात 23 सक्रिय रुग्ण आहेत.