Dr. Narendra Dabholkar Case: डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा CBI सहा वर्षांपासून तपास करुनही मुख्य सूत्रधार अजून पकडला गेला नाही- हमीद दाभोलकर

गेली 6 वर्षे सीबीआय हा घटनेचा तपास करत असून या हत्येमागील मुख्य सूत्रधार अजून पकडला गेला नाही आहे अशी टिका नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र हमीद दाभोळकर (Hamid Dabholkar) यांनी केली आहे.

Dr. Narendra And Hamid Dabholkar (Photo Credits: PTI)

पुण्यात 20 ऑगस्ट 2013 सकाळच्या सुमारास रस्त्यावर अंधश्रद्धा विरमूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्या नंतर सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे ही दोन नावे समोर आली. या दोघांनी मिळून हत्येसंदर्भातील पुरावे, हत्यारे नष्ट करण्यास मदत केल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली होती. मात्र गेली 6 वर्षे सीबीआय हा घटनेचा तपास करत असून या हत्येमागील मुख्य सूत्रधार अजून पकडला गेला नाही आहे अशी टिका नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर (Hamid Dabholkar) यांनी केली आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, "गेली 6 वर्षे सीबीआय डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करत आहे. यात अनेकांना अटक करण्यात आली. मात्र या हत्येमागील मुख्य सूत्रधार अजून पकडला गेला नाही. सर्व बाजूंनी विचार करण्याचे स्वातंत्र्य असणा-या या टीमला मेमका कसला धोका आहे" असे नरेंद्र दाभोळकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी ANI शी बोलताना सांगितले आहे.

हेदेखील वाचा- Sushant Singh Rajput Family Statement: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रीया; दोषींना शिक्षा होणार असा व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित शरद कळसकर (Sharad Kalsakar) याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती, यामध्ये त्याने 'मी आणि साथीदार सचिन अंदुरे (Sachin Andure) याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला,' अशी माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (CBI) दिली होती.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणी 19 ऑगस्ट महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला. सीबीआयकडे (CBI) सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सोपवल्याने सुशांतचे कुटुंबिय, चाहते यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली आहे.