लवकरच मुंबई -पुणे आणि मुंबई शिर्डी प्रवासासाठी Helicopter सेवा होणार सुरु, अमेरिकन कंपनी Fly Blade ची भारतात मिळणार सेवा

भविष्यात पुणे (Pune) आणि नाशिक -शिर्डी (Shirdi) हेलिकॉप्टर राईड सेवेने जोडला जाईल. सुरुवातीला ही सेवा केवळ शहरांतर्गत (Intracity) ठेवण्यात येईल.

Fly Blade Helicopter | Photo credit :Twitter

लवकरच मुंबईकरांना हेलिकॉप्टरमधून महाराष्ट्रात फिरण्याची नवी सोय उपलब्ध होणार आहे. अमेरिकन कंपनी Fly Blade Inc भारतामध्ये दाखल होणार आहे. मुंबईकरांसाठी (Mumbai)  मार्च 2019 पासून हेलिकॉप्टर राईडची सोय मिळणार आहे. भविष्यात पुणे (Pune) आणि नाशिक -शिर्डी (Shirdi)  या भागातही त्यांच्या सेवा विस्तारित होण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. सुरुवातीला ही सेवा केवळ शहरांतर्गत (Intracity) ठेवण्यात येईल.

Fly Blade Incही अमेरिकन कंपनी भारतामध्ये दिल्लीतील  Hunch Ventures सोबत भारतामध्ये गुंतवणूक करत आहे. मुंबईत जुहू (Juhu)  आणि महालक्ष्मी (Mahalaxmi)  या परिसरातून हेलिकॉप्टर सेवा सुरु होणार आहे. हेलिकॉप्टरमुळे मुंबई -पुणे हा प्रवास अवघ्या 35 मिनिटांत पार होणार आहे. सध्या बस किंवा रेल्वेच्या माधयमातून किमान 2 ते अडीच तासात मुंबई -पुणे प्रवास करता येतो. मात्र हेलिकॉप्टर सेवा सुरु झाल्यानंतर तो प्रवास अधिक वेगवान होणार आहे. पुण्यापाठोपाठ शिर्डीमध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरु करण्याचा मानस आहे.

विकेंडमध्ये भटकणाऱ्या प्रवासी वर्गासाठी किंवा भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुकर व्हावा याकरिता ही हेलिकॉप्टर सेवा फायद्याची ठरणार आहे. Electric vertical take-off आणि landing (eVTOL) या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर कडून भारतामध्ये केला जाणार आहे. सध्या भारतामध्ये VVIPमंडळींना, पर्यटनासाठी, निवडणूक दौऱ्यादरम्यान, देवदर्शनासाठी खास चार्टर विमान उपलब्ध आहेत. राज्याची (पवन हंस) Pawan Hans, Global Vectra Helicorp, Heligo charters, Himalayan Heli Services, United Heli Charters, या कंपनी हेलिकॉप्टरची सोय देतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif