Flower Market on Diwali festival: दिवाळीत कोमेजला फुलांचा बाजार; झेंडू, शेवंती पन्नाशीच्या आत

ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या झेंडू (Marigold), शेवंती (Shevanti Flowers) आदी फुलांचा भाव चांगलाच गडगडला

Flower Market | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दिवाळी सुरु होताच मागणीपेक्षाही पुरवठा अधिक झाल्याने यंदा फूल बाजार (Flower Market on Diwali festival) चांगलाच कोसळला. ऐन दिवळीत मागमीपेक्षा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने फूल बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या झेंडू (Marigold), शेवंती (Shevanti Flowers) आदी फुलांचा भाव चांगलाच गडगडला. पाठमागील दिवाळीत प्रति किलो 100 ते 120 रुपये किलो दराने विकली जाणारी झेंडुची फुले यंदाच्या दिवाळीत मात्र प्रति किलो पन्नाशीच्या आत विकली जात आहे. बाजारातील ताज्या माहितीनुसार झेंडू सरासरी प्रति किलो 30 रुपये तर शेवंती प्रति किलो 40 रुपये दराने विकली जात आहेत. फूल बाजार कोसळल्याने व्यापाऱ्यांसहीत फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगलाच फटका बसला आहे.

यंदा दसरा आणि नवरात्रोत्सवात फूल बाजारात फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे फुलांना भावही चांगला मिळाला. व्यापाऱ्यांनी मोठा नफा कमावला. शेतकऱ्यांच्या खिशातही चारदोन रुपये अधिकचे गेले. त्यामुळे बाजारात विक्रेत्यांसाठी उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, दिवाळीतही फूल विक्रीतून दिवाळी होईल असा अनेकांचा कयास होता. मात्र तसे घले नाही. दिवाळीत फुलांना अधिक भाव मिळेल या अपेक्षेने दिवाळीत फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. परिणामी फुलांची दर गडगडले. (हेही वाचा, Shubh Deepavali Messages: दिवाळीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत दणक्यात साजरा करा सण दीपावलीचा)

सध्या फूल बाजारात सर्वाधिक विक्री होणारी झेंडुची पुले प्रति किलो 40 ते 50 रुपये दराने विकली जात आहेत. तर इतर वेळी शंभरीच्याही पार असलेली शेवंती फुले सुद्धा 40 ते 50 रुपये किलोनेच विकली जात आहेत. भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्त्व आहे. हे महत्त्व ओळखून अलिकडील काळात आधुनिक शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुल उत्पादन करतात. यात प्रामुख्याने झेंडू, गुलाब, शेवंती आणि इतरही काही फुलांचा समावेश असतो. सर्वसामान्यपणे झेंडू हे सहज उपलब्ध असारे फूल असल्याने त्याचे उत्पादन मोठे होते. भारतात झेंडू उत्पादकांची संख्या मोठी आहे.