नवऱ्याशी भांडण झाले, पत्नीनेच केली मुलाची हत्या
सांताक्रुझमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्याचे जोराचे भांडण झाल्याच्या वादातून पत्नीनेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे.
सांताक्रुझमध्ये राहणाऱ्या एका दांम्पत्याचे जोराचे भांडण झाल्याच्या वादातून पत्नीनेच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. तर या महिलेने तिच्या मुलाला विष पाजत स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
रिना अहिरे असे या महिलेचे नाव आहे. तिचे बुधवारी रात्री नवऱ्यासोबत घरगुती वादातून भांडण झाले. त्यानंतर ती भांडणाच्या रागातून तिच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडली. या प्रकरणी रिना हिने एका दुकानातून उंदिर मारण्याचे औषध घेऊन आधी स्वत: पिऊन नंतर मुलाला पाजले. यामुळे रिनाच्या पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर रिनावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेप्रकरणी महिला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेची माहिती तिच्या नवऱ्याला कळताच त्याला धक्का बसला आहे.