Fishing boat capsized in Sindhudurg: मालवणमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेली बोट समुद्रात उलटली; 3 जणांचा मृत्यू

त्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

Fishing | Representational image (Photo Credits: pxhere)

Fishing boat capsized in Sindhudurg: एकीकडे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ही घटना घडल्याने मालवणमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेतील तिघांचे देखील मृतदेह सापडले असून हे तिघेही खलाशी आजराचे असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम आडकर असे यातील एका मृताचे नाव आहे. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती. (हेही वाचा: Atal Setu affects Fishing: अटल सेतूमुळे 60 टक्के मासे कमी झाल्याचा मच्छिमार संघटनेचा आरोप; नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव)

आजरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील एक बचावला गेला. मात्र, दुदैवाने 3 खालाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. (हेही वाचा:Fish In Mumbai Local Track: मुंबईत रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्यात पोहतात मासे (Watch Video) )

बचावलेला एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली. तिघांचा शोध घेताना नागरिकांना तिनही खलाशांचे मृतेदह सापडले. ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाबाहेर खलाश्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.