या ठिकाणी होईल लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन
त्यामुळे लालबाच्या राजाचे दर्शन लाईव्ह पद्धतीने होत असते
मुंबई, महाराष्ट्र आणि भारतासह जगभरातील असंख्य गणेश भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे लालबागचा राजा. त्यामुळेच तर गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत असतात. खरे तर, गणेशोत्सवाची लगबग सुरु होताच गणेशभक्त लालबागला गर्दी करतात. लालबागच्या राजाचे यंदाचे आकर्षण काय, हा त्यांच्या उत्सुकतेचा विषय. तसेच, लालबागच्या राजाचे दर्शन हा तर या भक्तांसाठी आनंदाची आणि समाधानाची पर्वणी देणारा क्षण. म्हणूनच तर, लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन कधी घडेल, यासाठी भक्त आस ठेऊन असतात. म्हणूनच जाणून घ्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन तुम्हाला कुठे घडेल.
या ठिकाणी घडेल लालबागच्या राजाचे प्रथमदर्शन
सुरुवातीची अनेक वर्षे लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे तर, प्रत्यक्ष लालबागलाच यावे लागत असे. पण, गेल्या काही काळात लालबागचा राजाही हायटेक झाला आहे. त्यामुळे लालबाच्या राजाचे दर्शन लाईव्ह पद्धतीने होत असते. त्यासाठी लालाबागच्या राजा गणेश मंडळाच्या अधिकृत सोशल मीडिया पेज (फेसबुक, ट्विटर आदि.) आणि युट्यूबवर वरुन तुम्ही दर्शन घेऊ शकता.
कधी मिळेल लालबागच्या राजाचे दर्शन
दरम्यान, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाचं पहिलं फोटोसेशन (मीडिया साठी) आज (मंगळवार, ११ सप्टेंबर २०१८) रात्री ८.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. तसेच, प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत youtube, Facebook, Twitter आणि Website वर उपलब्द असेल, असेही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने म्हटले आहे.