सांताक्रुजमध्ये इमारतीला भीषण आग
सांताक्रुझमधील एका व्यवसायिक इमारतीला भीषण आगल्याची घटना आज घडली आहे. कलिना जवळील गुलजार हाऊस असं या इमारतीचे नाव आहे. या इमारला लागलेल्या आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोळ पाहायला मिळत आहेत.
गुलजार हाऊसला आग लागेल्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे 5 बंबासहित 4 पाण्याचे टँकर आणि एक रुग्णवहिका पोहचले आहेत. तर अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. तसेच या इमारीतमध्ये लोक अडकले आहेत का याची तपासणी केली जात आहे.
Mumbai: A fire has broken out in Gujral House building at CST road, Kalina, Santacruz. Fire fighting operations are underway. More details awaited. pic.twitter.com/6s5V2k8mqT
— ANI (@ANI) October 18, 2018
इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2018 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

