Girgaon Fire: गिरगाव मध्ये भीषण आग; अंदाजे 16 दुचाकी, चारचाकींचं नुकसान
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई मध्ये गिरगाव (Girgaon) भागात पुंगालिया हाऊस कंपाऊंड मध्ये भीषण भडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामध्ये 5-6 कार आणि 8-10 दुचाकी जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. या कंपाऊंड मध्ये ठेवलेले लाखो रूपयांचे कपडे, प्लॅस्टिक आणि नायलॉनचे रोल देखील आगीत भस्मसात झाले आहेत. आगीच्या लपेट मध्ये 2 घरांनी देखील पेट घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
आगीचं वृत्त समजाताच तातडीने अग्निशमन दल, रूग्णावाहिका, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र 2 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये फायर ब्रिगेडला यश आलं आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पहा ट्वीट
दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आगी लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुंबई मध्ये काल पाडवा आणि भाऊबीज असे दोन्ही सण एकत्र साजरे केले असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडून या सणाचा आनंद लुटला. यंदा कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामध्ये दिवाळी साजरी होत असल्याने 2 वर्षांनी पुन्हा हा सण जल्लोषात साजरा झाला.