Mumbai Fire: अंधेरी येथील इमारतीमध्ये सिलेंडर ब्लास्ट मुळे भडकली आग, 2 जखमी
अंधेरीच्या यारी रोड परिसरातील सरिता इमारतीच्या एका घरात अचानक आग लागून त्यापाठोपाठ सिलेंडरचा ब्लास्ट झाला असल्याचे समोर येतेय.
मुंबई: मुंबईकरांवरच आगीचं (Mumbai Fire) संकट काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये, दरदिवशी समोर येणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये आज आणखीन एक प्रसंग वाढला आहे, अंधेरी (Andheri) येथील 'सरिता' इमारतीतील चौथ्या मजल्यावर एकाएकी आग लागल्याचे समजतेय. अंधेरी मधील प्रसिद्ध यारी रोड (Yaari Road) वरील मंझिल मशिदीच्या (Manzil Masjid) चौकातील या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून अचानक आग लागली व त्यापाठोपाठ अवघ्या काहीच क्षणात घरातील सिलेंडर ब्लास्ट (Cylinder Blast) झाल्याने मोठा आवाज झाला हा आवाज ऐकून व इमारतीतुन धुराचे लोट वाहताना दिसल्यावर नागरिकांनी तिथे धाव घेतली. या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे, याव्यतिरिक्त सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे अजून समजले नाहीये.याबाबत माहिती देणारे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
ANI ट्विट
या आधी गोरेगाव परिसरात देखील अशाच पद्धतीने बेस्टच्या बसने एकाएकी पेट घेतला होता, या घटनांमध्ये जीवितहानीचे प्रसंग होत नसले तरी आर्थिक दृष्टीने मोठे नुकसान होत आहे, यावरून अग्नी सुरक्षेच्या बाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज भासू लागलीय. Mumbai Fire: गोरेगाव परिसरात उभ्या BEST च्या बसने घेतला पेट, प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
घटना प्रसंगी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने दाखल झाल्या आहेत, तसेच किंचित संशयी पद्धतीने लागलेल्या या आगीचा तपास करण्यासाठी पोलिसही उपस्थित आहेत. या संदर्भातील सविस्तर तपास झाल्यावर पूर्ण माहिती हातात येईल .