Fire Breaks Out at Scindia House in Mumbai: पश्चिम मुंबई परिसरात बेलार्ड इस्टेट येथील सिंधिया हाऊस इमारतीला आग

सिंधिया हाऊस ही दक्षिण मुंबई परिसरातील बेलार्ड इस्टेट (Ballard Estate ) येथील पाच मजली व्यावासायीक इमारत (Commercial Building) आहे.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

मुंबई शहरातील सिंधिया हाऊस (Scindia House ) इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. सिंधिया हाऊस ही दक्षिण मुंबई परिसरातील बेलार्ड इस्टेट (Ballard Estate ) येथील पाच मजली व्यावासायीक इमारत (Commercial Building) आहे. बुधवारी पहाटे या इमारतीला आग (Fire Breaks Out at Scindia House in Mumbai) लागल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आगीत कोणत्याही प्रकारजी जीवित हानी झाली नाही. वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समजते. काही वर्षांपूर्वी याच इमारतीला आग लागली होती. त्या वेळी इमारतीतील कागदपत्रे जळाली होती.

या इमारतीला आग का लागली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. (हेही वाचा, Serum Institute Fire: सीरम इन्स्टिट्यूट येथे लागलेल्या आगीत 1000 कोटींचे नुकसान; कंपनीने घेतली मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाची जबाबदारी- CEO Adar Poonawalla)

जून 2018 मध्येही सिंधिया हाऊस या इमारतील आग लागली होती. त्यावेळी इमारतीत असलेली अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली होती. या आगीत त्या वेळी कोणतीही जीवित हानी झाली नव्हती मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगतले जाते.

दरम्यना, गेल्या काही दिवसांमध्ये औद्योगिक वसाहती आणि कंपनी कार्यालये, कारखाने यांन आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. भीवंडी येथील गोदामास, पालघर एमआयडीसी परिसरात कंपनीला आणि पुणे येथील सीरम इन्स्टीट्यूटला आग लागल्याच्या घटना काही दिवसांपूर्वीच घडल्या होत्या. त्यानंत आता पुन्हा मुंबई येथील व्यावसायिक इमारतीला आग लागण्याची घटना घडली आहे.