Thane Fire: ठाणे शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला आग

ही घटना ताजी असतानाच ठाणे (Thane) शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला (Biocell Company) आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Fire (Photo Credits: IANS|Representational Image)

Fire Breaks Out At Biocell Company In Thane City: कोरोना लसनिर्मिती सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली होती. ही घटना ताजी असतानाच ठाणे (Thane) शहरातील वागळे पोलीस ठाण्याजवळील बायोसेल कंपनीला (Biocell Company) आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. यासंदर्भात एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे.

या आठवड्यात ठाण्यात दोन ठिकाणी आग लागल्याचा प्रकार घडला आहे. याआधी ठाण्यात मंगळवारी (20 जानेवारी) रात्री स्वामी नारायण हॉलच्या सत्संग भवनात आग लागली होती. या आगीची माहिती होताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- Mahad Gas Leak: रायगडच्या महाड एमआयडीसीमधील अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती; 7 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर

 

एएनआयचे ट्विट-

कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. रमा शंकर हरिजन (उत्तर प्रदेश), बिपीन सरोज ( उत्तर प्रदेश), सुशील कुमार पांडेय (बिहार), महेंद्र इंगळे (पुणे) आणि प्रतीक पाष्टे ( पुणे) यांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व जण विद्युतविषयक काम करणारे कंत्राटी कामगार होते.