Mumbai Fire: बोरीवली येथील शॉपिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल

बोरिवली पश्चिम येथील शॉपिंग सेंटरमध्ये आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. इंदिराप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Borivali Fire | (Photo Credits: ANI)

बोरीवली पश्चिम (Borivali West) येथील शॉपिंग सेंटरमध्ये (Shopping Centre) आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली. इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये (Indraprastha Shopping Centre) ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही लेवल-4 आग असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ही आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. त्यामुळे धुराचे लोळ परिसरात पसरत आहेत. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर सकाळी 6 वाजता 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम अद्याप सुरु आहे. (Mumbai Fire: लोअर परेल परिसरात रघुवंशी मिल कमाऊंड मध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना)

ANI Tweet:

या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वी 25 जून रोजी लोअर परेल येथील रघुवंशी मिल कमाऊंडमध्ये आग लागली होती. ही आग लेव्हल 3 ची होती. मात्र त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement