Aurangabad Fire: औरंगाबादमधील वाळूज परिसरातील चटाई कंपनीला भीषण आग; आग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, कंपनीत काम सुरू असताना ही आग लागली.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

Aurangabad Fire: औरंगाबाद (Aurangabad) मधील वाळूज महानगर परिसरातील औद्योगित वसाहतीतल असलेल्या चटाई कंपनीला भीषण आग (Fire) लागली आहे. आगीमुळे परिसरात धुळीचे लोट उठले होते. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अश्निशमन दलाचे जवाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, कंपनीत काम सुरू असताना ही आग लागली. कंपनीत अनेक कामगार काम करत होते. मात्र, हे सर्व कामगार सुखरुप असून सर्वांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. (हेही वाचा -Aurangabad Fire: औरंगाबादमधील शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल)

दरम्यान, रविवारी मकर संक्रांतीच्या दिवशी औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरातील कपड्याच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानाचे मोठे नुकसाने झाले. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. शहरात एकामागोमाग एक आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.