मुंबई: नरीमन पॉईंट परिसरात एका बँकेला भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु
ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
मुंबईत आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या घटना ऐकायला मिळत आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबईतली नरीमन पॉईंट (Nariman Point) परिसरातील एका बँकेला आग लागली. सकाळची वेळ असल्यामुळे बँक बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरातील ‘बँक ऑफ बहरीन अँड कुवैत’च्या इमारतीला गुरूवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यानुसार अगिनशमन दल ही आग विझविण्याच प्रयत्न करत आहेत. बँक बंद असल्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली तसेच यात किती वित्तहानी झाली याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. मुंबई: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
2 दिवसांपूर्वी मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील (Mankhurd-Ghatkopar Link Road) मंडाला (Mandala) येथे एका भंगार असलेल्या गोदामाला देखील सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की या आगीला Level-3 म्हणून अग्निशमन विभागाने घोषित केले. 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.