मुंबई: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी 6:00 च्या सुमारास लागली. त्यानंतर हळूहळू या आगीने रौद्र रुप धारण करुन या गोदामात ही आग झपाट्याने पसरली.

मुंबई: मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Scrap Godown Fire (Photo Credits: Twitter/ANI)

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील (Mankhurd-Ghatkopar Link Road) मंडाला (Mandala) येथे एका भंगार असलेल्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की या आगीला Level-3 म्हणून अग्निशमन विभागाने घोषित केले आहे. 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे. ही आग आटोक्यात आली नसून ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मुंबई मिररने दिलेल्या माहितीनुसार, ही आग सकाळी 6:00 च्या सुमारास लागली. त्यानंतर हळूहळू या आगीने रौद्र रुप धारण करुन या गोदामात ही आग झपाट्याने पसरली. Mumbai Fire: मुंबईमध्ये धोबी तलाव जवळील Hotel Fortune येथे आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

पाहा व्हिडिओ

या गोदामात भंगाराचे सामान, तेलाचे वापरता नसलेले रिकामी डब्बे आदि गोष्टींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु असून सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग कशामुळे लागली याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या महाराष्ट्र कोरोना विषाणूची लढत आहे, अशात इतरही काही दुर्दैवी घटना घडतात ज्यामुळे सरकारवरील ताण अजूनच वाढत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2020 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).