जळगाव: भुसावळ येथील डिस्को इंटरप्रायजेस कंपनीला लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक, Watch Video
या डिस्को एन्टरप्रायजेस कंपनीमध्ये टिव्ही, फायबर, कुलर आदि वस्तूंची निर्मिती केली जाते. या कंपनीला आज सकाळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीचे नेमकं कारण अजून कळाले नसून वाऱ्याचा वेग व गवतामुळे आगीने पेट घेतला असे सांगण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ (Bhusaval) मधील डिस्को (Disco) कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळ येथील किन्ही MIDC A-12 प्लॉटमधील डिस्को एन्टरप्रायजेस या कंपनीला सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरीही आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या डिस्को एन्टरप्रायजेस कंपनीमध्ये टिव्ही, फायबर, कुलर आदि वस्तूंची निर्मिती केली जाते. या कंपनीला आज सकाळी अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीचे नेमकं कारण अजून कळाले नसून वाऱ्याचा वेग व गवतामुळे आगीने पेट घेतला असे सांगण्यात येत आहे. Mumbai Fire: नागपाडा परिसरातील Quarantine साठी वापर होणाऱ्या Rippon Hotel मध्ये आग; Coronavirus रुग्णांना सुखरूप बाहेर काढले
पाहा व्हिडिओ:
#WATCH Maharashtra: Fire breaks out a company in Bhusawal of Jalgaon district. Four fire tenders are present on the spot. pic.twitter.com/FnnxgIu09o
— ANI (@ANI) April 26, 2020
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊन असल्या कारणाने फारसे कामगार कंपनीत नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2020 03:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

