Fire at Navi Mumbai Commissioner's Residence: नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या निवास्थानाला आग
नेरुळ सेक्ट 15 मध्ये नवी मुंबई महापालिकेने 1998 मध्ये एक मोठा भूखंड सिडकोकडून विकत घेतला. या भूखंडावर चार बेडरूम, दोन हॉल, तीन बैठक रूम असा आलिशान बंगला बांधला. या बंगल्यातच आयुक्तांचा मुक्काम असतो. काही दिवसांपूर्वीच या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती.
नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) आयुक्तांच्या निवासस्थानाला आग (Fire at Navi Mumbai Municipal Commissioner's residence) लागली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एक खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नेरुळ अग्निशमन दलाचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. प्राप्त माहितीनुसार अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
आयुक्तांच्या घरातून धुराचे लोटच्या लोट मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताना दिसत होते. आयुक्ताच्याच घराला आग लागल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. बघ्यांची गर्दी झाल्यामुळे काही काळ परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता.
आयुक्तांचे निवासस्थान नेरुळ रेल्वे स्थानकासमोर आहे. नेरुळ सेक्ट 15 मध्ये नवी मुंबई महापालिकेने 1998 मध्ये एक मोठा भूखंड सिडकोकडून विकत घेतला. या भूखंडावर चार बेडरूम, दोन हॉल, तीन बैठक रूम असा आलिशान बंगला बांधला. या बंगल्यातच आयुक्तांचा मुक्काम असतो. काही दिवसांपूर्वीच या बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली होती.