Fire At Coronavirus Centre: मुंबईच्या दहिसर कांदरपाडा येथील कोरोना विषाणू केंद्रावर लागलेली आग वेळीच विझवली; मोठी आपत्ती टळली- BMC

त्याचे संचालन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने करण्यात येत आहे.

दहिसर कांदरपाडा कोरोना विषाणू केंद्रावर आग (Photo Credit : BMC)

दहिसर कांदरपाडा (Dahisar Kandarpada) येथे कोरोना विषाणू (Coronavirus) बाधितांवर उपचारासाठी 100 रुग्ण शय्या क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित आहे. त्याचे संचालन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) संयंत्राने आज, 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजून 11 मिनिटांच्या सुमारास पेट (Fire) घेतला. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका श्रीमती अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्णशय्येपासून दूर केले. प्रसंगावधान राखून संयंत्राला लागलेली आग वेळीच विझवली गेली. अशाप्रकारे एक मोठी आपत्ती टळली आहे.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत असणाऱ्या अतिदक्षता उपचार केंद्रामध्ये, रुग्णाशेजारी वैद्यकीय संयंत्राला लागलेली आग त्याचक्षणी प्रसंगावधान राखून विझवण्याची कामगिरी तेथील परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी पार पाडली. या दक्षतेबद्दल सर्व मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे. महानगरपालिकेकडून संचालित विविध कोरोना केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा-सुविधा दर्जेदारपणे पुरवण्यात येत आहेत. सोबत इतरही आवश्यक सुविधा तसेच सुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध असतील, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

या केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अग्नीशमन व आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देखील नियुक्तीप्रसंगी देण्यात आले आहे. त्याचा उपयोग अशा घटनांप्रसंगी विचलीत न होता कसा करावा, याचे उदाहरणच आजच्या घटनेतून या कर्मचाऱ्यांनी समोर ठेवले आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे. याआधी दक्षिण मुंबईच्या नागपाडा (Nagpada) परिसरातील बेलासिस रोडवरील रिपन हॉटेल (Rippon Hotel) मध्ये आग लागली होती. हॉटेलच्या लॉजिंग रूममध्ये लागली जिथे कोरोना व्हायरस संबंधीच्या पेशंट्सना वेगळे ठेवण्यात आले होते. यासह काही दिवसांपूर्वी नागपाडा परिसरातीलच सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग लागली होती. या दोन्ही आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif