पुणे: विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी मिरवल्याने 200 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी पिंपरी चिंचवड येथील शोभायात्रेत विनापरवाना एअर रायफल आणि तलवारी मिरवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषदेतील (Vishva Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील शोभायात्रेत विनापरवाना एअर रायफल आणि तलवारी मिरवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (2 जून) पुण्यातील नागी परिसरात (Nigdi Area) काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हा प्रकार समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या 200 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (2 जून) संध्याकाळी 5 ते 10 च्या दरम्यान ही शोभायात्रा यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान काढण्यात आली होती. या शोभायात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल तर पाच मुलींच्या हातात तलवारी असल्याचे निदर्शनास आले.
ANI ट्विट:
याप्रकरणी 200 कार्यकर्त्यांविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.