Wardha Gol Bazar Market Fire: वर्ध्या शहरातील गोल बाजार परिसरात भीषण आग; भाजी विक्रेत्यांची 10 ते 15 दुकाने जळून खाक

आगीमुळे शहरातील बाजारपेठेत धुराचे लोळ उठले होते. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Wardha Gol Bazar Market Fire: वर्धा शहरातील गोल बाजार परिसरात (Gol Bazar Market) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांची सुमारे 10 ते 15 दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

या आगीत भाजी विक्रेत्यांचं मोठ नुकसान झालं आहे. आगीमुळे शहरातील बाजारपेठेत धुराचे लोळ उठले होते. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोल बाजार परिसरात लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (वाचा - Bhandara Hospital Fire Incident: जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर आगीला महिना उलटला; Forensic Science Laboratory चा रिपोर्ट गुलदस्त्यातच)

दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी मानखुर्दमधील केमिकल कंपनीच्या गोदामाला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी मुंबई, नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 30 गाड्या, 50 हून अधिक पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेत अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला होता.