Nanoli Speedway Racetrack In Pune: ऑटो, मोटारस्पोर्ट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नानोली येथे उभारणार स्पीडवे
Nanoli Speedway उभारताना अत्याधनीक तंत्रज्ञान आणि भविष्यातील गरज आणि नागरिकांची बदलती अभिरुची डोळ्यासमोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे या ट्रॅकला चार बाय चार ऑफ रोड सेंटर, व्हाआयपी लाऊंज पॅड, पॅडॉक, गॅरेज आणि एक संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. यासोबतच वाहन तपासणीसाठी एक एक केंद्र आणि ट्रॅकचे दोन वेगवेगळे लेआऊटही तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्रातील ऑटो आणि मोटारस्पोर्ट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एफआयए ( FIA ) आणि एफएमएससी (FMSCI) या दोन्ही संस्थांकडून राज्याला नवीन रेस ट्रॅक निर्मितीसाठी मान्यता मिळाली आहे. हा रेस ट्रॅक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाजवळ (Mumbai-Pune Expressway) अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर साकारला जाणार आहे. हा ट्रॅक 'नानोली स्पीडवे' (Nanoli Speedway) म्हणून ओळखला जाईल. या ट्रॅकची रचना युके रेस ट्रॅक (UK-Based Race Track) च्या धरतीवर करण्यात येईल. भारताचे माजी एफ 1 रेसिंग ड्रायव्हर करुण चांढोक (Karun Chandhok) यानी या ट्रॅकचे डिझाईन साकारले आहे.
Nanoli Speedway उभारताना अत्याधनीक तंत्रज्ञान आणि भविष्यातील गरज आणि नागरिकांची बदलती अभिरुची डोळ्यासमोर ठेवली जाणार आहे. त्यामुळे या ट्रॅकला चार बाय चार ऑफ रोड सेंटर, व्हाआयपी लाऊंज पॅड, पॅडॉक, गॅरेज आणि एक संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. यासोबतच वाहन तपासणीसाठी एक एक केंद्र आणि ट्रॅकचे दोन वेगवेगळे लेआऊटही तयार करण्याचा प्रस्ताव आहे. (हेही वाचा, Make in India: देसी जुगाड सोशल मीडियावर VIDEO VIRAL; पुणे येथे आत्मनिर्भर शिक्षिकेचा Online Class)
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात अशाच प्रकाचा ट्रॅक तयार करण्याची करण्यात आलेली ही दुसरी घोषणा आहे. या आधी पुण्याजवळील कामशेत येथेही अशाच प्रकारचा ट्र्रॅक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. अशा प्रकारचा ट्रॅक उभारण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागते. अथिक खर्च येतो. त्यामुळे अशा प्रकारची उभारणी ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते.
भारतात आतापर्यंत अशा प्रकारचे तीन रेस ट्रॅक उभारण्यात आली आहे. त्यापैकी एक तामिळनाडू येथील करी स्पीडवे (Tamil Nadu - Kari Speedway) , मद्रास येथील मोटार रेस (MMRT) आणि त्यासोबतच ग्रेटर नोएडा येथील बौद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट (Buddh International Circuit in Greater Noida,) अशी त्यांची नावे आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)