मुंबई: गोरेगाव मध्ये महिला पोलिस कर्मचारीची आत्महत्या; Lockdown मुळे कुटूंबियांस सांगलीहून येण्याची परवानगी नाकारल्याने नाराजीचा सूर
सुरेखा बेरदे असे मृत महिलेचे नाव आहे.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अहोरात्र पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोरेगाव येथील SRPF कॅम्पमध्ये राहणा-या एका 27 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी ने राहत्या घरात आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सुरेखा बेरदे असे मृत महिलेचे नाव आहे. सांगलीत राहणा-या तिच्या कुटुंबियांना लॉकडाऊन मुळे मुंबईत येण्याची परवानगी नाकारल्याने संपूर्ण कुटूंबियांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा यांच्या पतीने त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीत मिळाला. सुरेखा हिच्या भावाने अर्जुन विवेकी यांनी सांगितले आहे. Coronavirus In Maharashtra: पुण्यामध्ये 42 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण
मृत सुरेखा यांच्या कुटूंबियांना सांगलीमध्ये सोमवारी संध्याकाळी 4 वाजता तिच्या मृत्यूची बातमी कळाली. त्यानंतर आम्ही सांगलीहून मुंबईत जाण्यासाठी ऑनलाईन पास प्राप्त करण्याची परवानगी मागितली. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय येथील पोलीस स्टेशनकडूनही आम्हाला काही मदत मिळाली नाही.
सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरेखाने आत्महत्या का केली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.