Mumbai: धक्कादायक! 5 वर्षाच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला कपड्यांवरून हात लावायचा बाप; कोर्टाने सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा
"आरोपींनी लैंगिक हेतूने असे (स्पर्श) केले. ज्यामुळे अल्पवयीन पीडितेच्या मनावर परिणाम झाला. हे वेगळे सांगण्याची गरज नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे.
Mumbai: मुंबईत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मदाता बाप आपल्या पोटच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्ट (Private Parts) ला कपड्यांवरून हात लावत असे. लैंगिक अत्याचाराशी संबंधीत या प्रकरणामध्ये विशेष पॉक्सो न्यायालयाने मुंबईतील 40 वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवले असून त्याला तुरुंगात पाठवले आहे. कपड्यांवरून आपल्या 5 वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला वारंवार स्पर्श केल्याबद्दल न्यायालयाने वडिलांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
युक्तिवादांना आश्चर्यकारक ठरवून न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, लैंगिक अत्याचाराच्या घटनेत आरोपीने मुलीच्या खाजगी भागांना कसे स्पर्श करावे हे POCSO कायद्याचे संबंधित कलम परिभाषित करत नाही. लैंगिक छळाशी संबंधित गुन्हा आरोपीच्या लैंगिक हेतूबद्दल सांगतो. (हेही वाचा - Crime: दारू खरेदीवरून झालेल्या वादातून दुकानाच्या व्यवस्थापकाची हत्या)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यायालयाने नमूद केले की, मुलीला अयोग्यरित्या स्पर्श केल्यानंतर तिने विचित्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. "आरोपींनी लैंगिक हेतूने असे (स्पर्श) केले. ज्यामुळे अल्पवयीन पीडितेच्या मनावर परिणाम झाला. हे वेगळे सांगण्याची गरज नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे.
2019 मध्ये, एका वर्गशिक्षिकेने मुलीच्या आईला सांगितले की ती शाळेच्या बेंचच्या कोपऱ्यात तिचा खाजगी भाग घासत होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. जे एक असामान्य वर्तन होते. आरोपीचे निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने सांगितले की, "बाप हा मुलांची एक प्रकारची ढाल असतो, आपल्या मुलीचा विश्वस्त असतो. मात्र, हे प्रकरण धक्कादायक आहे."
वडिलांनी असा दावा केला होता की, आईने (त्याच्या पत्नीने) त्याला खोटे आरोप करून फसवले आहे. कारण, मुलाची काळजी घेण्यात अनास्था दाखवल्याने त्यांचे अनेकदा भांडण होत होते. मुलीची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. तथापि, मुलीने हे दावे नाकारले आणि सांगितले की तिची आई "चांगले अन्न" शिजवते.
"पीडितेची कृती प्रथम तिच्या शिक्षिकेच्या लक्षात आली आणि नंतर तिच्या आईला ते कळले. त्यामुळे तक्रारी खोटी नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे. POCSO न्यायालयाने 40 वर्षीय मुंबईतील व्यक्तीला दोषी ठरवले. आपल्या 5 वर्षांच्या मुलीच्या खाजगी भागांना कपड्यांवरून वारंवार स्पर्श केल्याबद्दल त्याला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.