Nashik Accident: कसारा घाटात भीषण अपघात; वाहन दरीत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू

शहापूर तालुक्यातील नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा ताबा सुटून कंटेनर थेट घाटातील दरीत कोसळला. यात पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Photo Credit- X

Nashik Accident: नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा भीषण अपघात झाला. सध्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अजून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. धक्कादयक म्हणजे मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. (हेही वाचा: Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक)

श्लोक जायभाय (वय 9, रा. नालासोपारा), अक्षय गुगे (वय 30, रा . नवीमुंबई ), अनिकेत वाघ (वय 21 रा .सिन्नर) या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये मुंबईतील दोघांचा समावेश आहे. दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केले आहे. यात आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कंटेनर ५ प्रवाशांना घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान कसारा घाटात आल्यानंतर घाट रस्त्यावर उतार असल्याने कंटेनर चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर थेट खोल दरीत कोसळला. यात कंटेनरमधील ५ ही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील दोघांचा समावेश असून एका ९ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement