FASTag चा वापर करणार्‍यांना Mumbai-Pune Expressway, Bandra-Worli Sealink वर 11 जानेवारी पासून 5% कॅशबॅक

यामुळे टोल प्लाझावर थांबून टोल न देता तो कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून कापला जातो.

Fastag | Photo Credits: Fastag.org

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai-Pune Expressway) आणि वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) या मार्गावर प्रवास करणार्‍या वाहनांवर फास्टटॅग असल्यास त्यांना 5% कॅशबॅक मिळणार आहे. दरम्यान राज्यात फास्टटॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही योजना सुरू केली आहे. 11 जानेवारीपासून ही कॅशबॅक योजना सुरू होणार आहे. FASTag ला आता Prepaid touch and Go Card चा पर्याय; NHAI ची 1 जानेवारीपासून नवी सुविधा.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जारी केलेल्या पत्रकामध्ये ही सवलत कार, जीप, एसयुव्ही कार यांना मर्यादीत काळासाठी लागू असेल. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि वांद्रा वरळी सी लिंकवर प्रत्येक फेरीला वाहनधारकाला ही 5% सवलत दिली जाईल.दरम्यान कॅशबॅकची रक्कम थे बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे. FASTag Deadline Extended: केंद्र सरकारकडून वाहनधारकांना दिलासा; फास्टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली.

दरम्यान अधिकाधिक लोकांनी त्यांच्या वाहनावर फास्टटॅग लावून घ्यावं याकरिता वांद्रे वरळी सी लिंकचा नाका आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर, तळेगाव नाका, फूड मॉळ,पेट्रोल पंप येथे काही बॅंकांच्या मदतीने फास्टटॅग स्टॉल सुरू करण्यात आले आहेत.

फास्टटॅग प्रोग्राम ही radio-frequency identification technology वर चालते. यामुळे टोल प्लाझावर थांबून टोल न देता तो कोड स्कॅन करून थेट अकाऊंट मधून कापला जातो. याकरिता फास्टटॅग सोबत लिंक केलेल्या बॅंक वॉलेट मधून डिजिटली पैसे कापले जातात.

Ministry of Road Transport and Highways कडून महाराष्ट्रात टोल प्लाझा वर फास्ट टॅग सिस्टिम उभारण्यासाठी MSRDC ला नोडल एजंसी बनवले आहे. एसएसआरडीसीच्या माहितीनुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, वांद्रा वरळी सी लिंक, सातारा कागल हायवे आणि चार मुंबईमध्ये प्रवेश करणार्‍या एंट्री पॉईंट्सवर FASTag वापरलं जातं.