मुंबई: अज्ञात जागेवरुन आला रॉड; थेट फॅशन डिझायनर महिलेच्या कारमध्येच घुसला

रिंकू जैन यांच्या सोबत ही घटना घडली तेव्हा कारमध्ये चालकासह त्यांची एक नातेवाईकही होती. त्यांनी उबर टॅक्सी बुक केली होती. त्यांची कार जोगेश्वरी येथे वस्टर्न एक्सप्रेस फ्लायओव्हरजवळ आली. दरम्यान, एक रॉड अचाकन त्यांच्या कारमध्ये पुढच्या बाजून घुसला.

iron rod | | Image only representative purpose (Photo credit: Pixabay)

मुंबई शहरातून प्रवास करायचा अथवा काही कामासाठी रस्त्यावरुन फिरायचे असेल तर जीव मुठीत घेऊनच फिरण्याची वेळ मुंबईकरांवर आलेली आहे. एका फॅशन डिझायनर महिलेसोबत जोगेश्वरी पश्चिम (Jogeshwari West) येथील वस्टर्न एक्सप्रेस हायवेवर (Western Express Highway) मंगळवारी (30 जुलै 2019) अशीच एक घटना घडली. ज्यामुळे मुंबई शहरातील नागरिक किती असुरक्षीत आहे हे अधोरेखीत झाले. रिंकू जैन (Rinku Jain) नामक एक फॅशन डिझायनर (Fashion Designer) महिला काही कामसाठी कारने मुंबईत प्रवास करत होती. दरम्यान, एका अज्ञात ठिकाणाहून एक रॉड अचाकन आला आणि थेट रिंकू जैन यांच्या कारमध्येच घुसला. दहा फूट लांबीचा हा रॉड कारमध्ये घुसल्याने रिंकू जैन या जखमी झाल्या.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना दक्षिण मुंबई परिसरात घडली. रिंकू जैन यांच्या सोबत ही घटना घडली तेव्हा कारमध्ये चालकासह त्यांची एक नातेवाईकही होती. त्यांनी उबर टॅक्सी बुक केली होती. त्यांची कार जोगेश्वरी येथे वस्टर्न एक्सप्रेस फ्लायओव्हरजवळ आली. दरम्यान, एक रॉड अचाकन त्यांच्या कारमध्ये पुढच्या बाजून घुसला. साधारण दहा फुट लांबीचा रॉड कारच्या पुढच्या बाजुने काचेत घुसला. त्यामुळे कारच्या पुढच्या काचेला मोठा तडा गेला आणि ती फुटली. फुटलेल्या काचेचे अनेक तुकडे रिंकू जैन यांच्या चेहऱ्यावर उडले ज्यात त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर रिंकू जैन यांनी वनराई पोलीस स्थानकात तक्रार दिली.

घडलेल्या घटनेबद्दल बोलताना रिंकू जैन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आम्ही कारने प्रवास करत होतो. मी माझ्या पतीशी फोनवर बोलत होते. आमची कार साधारण प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगाने धावत होती. आम्ही जोगेश्वरी येतील वेस्टर्न एक्सप्रेस फ्लायओव्हर जवळ आलो. आणि अचानक एक रॉड कुठून तरी आला आणि कारमध्ये घुसला. (हेही वाचा, IIT Bombay च्या वर्गात घुसला बैल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासन अजूनही शांतच (Video))

जैन यांनी पुढे सांगितले की, उबर टॅक्सीचालक संतोष महाले याने रॉड कारमध्ये घुसल्याचे पाहताच गाडी जागेवरच थांबवली. या प्रकारामुळे आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. गाडीचा वेग मर्यादेत होता म्हणून आम्ही वाचलो. अन्यथा तो रॉड थेट माझ्या शरीरात घुसला असता. पोलिसांनी हा रॉड कारमधून बाहेर काढला. तसेच, या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही तपासत असल्याचेही रिंकू जैन यांनी म्हटले आहे.