महाराष्ट्रातील टॉमेटो शेतकऱ्यांचे आंदोलन, योग्य भाव मिळत नसल्याने उतरले रस्त्यावर
कारण शेतकऱ्यांकडून टॉमेटो ज्या भावा खरेदी केले जातात त्यामुळे ते संतप्त आहेत.
Farmer's Protest: महाराष्ट्रातील टॉमेटो शेतकऱ्यांनी आज आंदोलन केल्याचे समोर आले आले आहे. कारण शेतकऱ्यांकडून टॉमेटो ज्या भावा खरेदी केले जातात त्यामुळे ते संतप्त आहेत. यामुळेच ते आता रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी टॉमेटोच्या माळा घालून आंदोलन करताना दिसून आले.(सोलापूर: पीकाला हमीभाव नसल्याचं सांगत शेतकर्याने जिल्हाधिकार्याकडे मागितली गांजा शेती ची परवानगी; पोलिसांनी म्हटलं 'पब्लिसिटी स्टंट')
औरंगाबाद मध्ये शेतकऱ्यांना टॉमेटोला योग्य दर मिळत नसल्याने त्यांनी संतप्त आहेत. टनच्या टन टॉमेटो रस्त्यांवर फेकत त्यांनी विरोध केला. त्याचसोबत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, महाराष्ट्रातील बाजापात सामान्य लोकांसाठी टॉमेटोचे भाव 10-20 रुपये किलोने विक्री केले जात आहेत. मात्र जेव्हा शेतकऱ्यांकडून 20 किलो टॉमेटो 5 रुपये थोक भावाने खरेदी केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होत आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांनी विरोध करत ते रस्त्यावर उतरले.
शेतकऱ्यांच्या मते, टॉमेटो लवकरच खराब होतात. त्यामुळे जबरदस्तीने शेतकऱ्यांना टॉमेटो विक्री करावे लागत आहेत. याचाच फायदा थोक व्यापारी घेत आहेत. शेतकऱ्यांकडून कमी पैशांमध्ये थोक व्यापारी टॉमेटो खरेदी करतात. त्यानंतर ते मोठ्या शहरात जादा दराने टॉमेटो विक्री करतात. थोक व्यापाऱ्यांचे हे वागणे शेतकऱ्यांसाठी फार नुकसानकारतक आहे.(राज्यात लवकरच सुरु होऊ शकतात बैलगाडी शर्यती; याबाबत महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याची मंत्री सुनील केदार यांची माहिती)
दरम्यान, औरंगाबाद-मुंबई हायवे वर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. काही ट्रॅक्टर मधील टॉमेटो सुद्धा रस्त्यांवर फेकून दिले गेले. लातूर स्थानकात टॉमेटोच्या दरामुळे संतप्त झालेले शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले.