Vardha Shocker: कुटूंबाकडे अंत्यविधीसाठी पैसे नाही म्हणून मृतदेहला पुरुन ठेवलं घरात; वर्धातल्या घटनेमुळे पोलीसही चक्रावले

आढवडाभर महिलेचा मृतदेह घरात खड्डा खोदून पुरला. वर्धात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Vardha Shocker:  वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम  (Sevagram) परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कुटूंबातील महिलाचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर तीच्या कुटूंबियानी मृतदेह (Deathbody) घरातच खड्डा करुन पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे सेवाग्राम पोलीस ठाण्याअंतर्गत (Sevagram Police Station) नोंद घेण्यात आली आहे. सेवाग्राम येथील आदर्शनदर भागात ही घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने ही घटना आठवडाभरानंतर उजेडात आली.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच गुरुवारी घटनास्थळी जावून तपासणी केली. मृत झालेल्या महिलेचे संपुर्ण कुटूंब मानसिक आजारी असल्याची माहीती पोलीसांना मिळाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कुटूंबातील सर्व सदस्य मानसिक आजारी असल्यामुळे शेजारील नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. कुटुंबात वृद्ध आई-वडील, बहीण भाऊ यांचा समावेश होता. हे आर्दशनगर येथील रहिवासी आहेत.  आजारपणामुळे रोज भांडणाचा आवाज येत असे माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली. रोज त्यांच्यात वादविवाद होत रहायचे.

या कुटुंबातील मृत मुलगी तीन वर्षांपासून एका गंभीर आजाराच्या विखळ्यात होती. तिच्या आजारपणावर उपचार झाले नाही. या मुलीचा ३ जुलै रोजी मुलीने शेवटचा श्वास सोजला.  यावर तिच्या मनोरुग्ण आईवडिलांचा विश्वास बसत नव्हता. वृद्ध आईवडीलांनी मृतदेहाजवळ रात्रभर बसून राहिले. आता घरात पैसे नाही म्हणून करायचं काय असा प्रश्न पडला. तिचा अंत्यविधी कसा करायचा पैसे कुठून आणायचे ह्या प्रश्नात अडकलेल्या दामप्तायंनी शेवटी घरातच मृतदेह लपवला.

घरातच पलंगाजवळ एक खड्डा खोदून मुलीचा मृतदेह पुरला. शेजारच्या मुलगी बऱ्याचं दिवसांपासून दिसली नाही म्हणून त्यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्याच खबर दिली. पोलीसांनी गुरुवारी १३ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता  संपुर्ण घटनेची चौकशी केली. पोलीसांनी अखेर मृतदेह सोधून काढला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

 

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement