नवी मुंबई: छेड काढल्याची पोलिसात तक्रार केल्याने पीडित तरुणीसह तिच्या भावावर माथेफिरू कुटूंबाने केले कोयत्याने वार, भावंडांची प्रकृती चिंताजनक

पीडित मुलीची आणि तिच्या भावाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Crime | (Photo Credits: PixaBay)

दोन कुटुंबांमध्ये सुरु असलेल्या भांडणाचे रुपांतर एका भावंडांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईच्या कोपरी गावात (kopri) घडली आहे. छेड काढल्याची तक्रार पीडित मुलीने पोलिसांत केल्याने तोच राग मनात ठेवून आरोपी कुटूंबातील लोकांनी त्या मुलीसह तिच्या भावांवर जीवघेणा हल्ला केला. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, यात कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. यात पीडित मुलीची आणि तिच्या भावाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छेड काढल्याचा आरोप करत पीडित तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी कुटुंबाने तरुणीसह तिच्या भावांवर कोयत्याने हल्ला केला असे सांगण्यात येत आहे. रितिक आणि अमित हे भाऊ, तर त्यांची बहीण काजल हिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तिघांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात तरुणीचा दुस-या भावाची प्रकृती स्थिर आहे.हेदेखील वाचा- Coronavirus: अंधेरी परिसरात क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित महिलेसोबत छेडछाड, एकास अटक

दरम्यान, जखमी भावंडांना वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी भाऊ अमित आणि बहीण काजल या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरा भाऊ रितिक याची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी हल्लेखोर आरोपी श्रीनिवास अय्यरला ताब्यात घेतले आहे. तर इतर चार जण घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement