महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

वयाच्या 84 व्या वर्षी शिवाजीराव देशमुख यांचे मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये निधन झाले.

Shivajirao Deshmukh (Photo Credits: Twitter)

कॉंग्रेस नेते शिवाजीराव देशमुख (Shivajirao Deshmukh) यांचे आज मुंबईत दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी शिवाजीराव देशमुख यांचे मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजारामुळे (Chronic Kidney Disease) त्रस्त होते. अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवाजीराव देशमुख विधानपरिषदेचे माजी सभापती (Ex Chairman Maharashtra Legislative Council ) आणि वसंतदादा पाटील यांचे सहयोगी म्हणून ओळख होती. कॉंग्रेस पक्षामध्ये शिवाजीराव देशमुख यांना आदराचे स्थान होते. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर सभापतीपदी बिनविरोध तीन वेळेस शिवाजीराव देशमुख निवडून आले होते.

कॉंग्रेस पक्षाचे मार्गदर्शक हरपल्याची भावना कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. उद्या सांगली

जिल्ह्यामधील कोकरूड या ठिकाणी शिवाजीराव देशमुख यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत.