महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन
वयाच्या 84 व्या वर्षी शिवाजीराव देशमुख यांचे मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये निधन झाले.
कॉंग्रेस नेते शिवाजीराव देशमुख (Shivajirao Deshmukh) यांचे आज मुंबईत दीर्घ आजारामुळे निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी शिवाजीराव देशमुख यांचे मुंबईतील 'बॉम्बे हॉस्पिटल'मध्ये निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजारामुळे (Chronic Kidney Disease) त्रस्त होते. अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजीराव देशमुख विधानपरिषदेचे माजी सभापती (Ex Chairman Maharashtra Legislative Council ) आणि वसंतदादा पाटील यांचे सहयोगी म्हणून ओळख होती. कॉंग्रेस पक्षामध्ये शिवाजीराव देशमुख यांना आदराचे स्थान होते. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर सभापतीपदी बिनविरोध तीन वेळेस शिवाजीराव देशमुख निवडून आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, राज्य मंत्रीमंडळातले माजी मंत्री आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे दु:खद निधन.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/MM1OetAhji
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 14, 2019
कॉंग्रेस पक्षाचे मार्गदर्शक हरपल्याची भावना कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. उद्या सांगली
जिल्ह्यामधील कोकरूड या ठिकाणी शिवाजीराव देशमुख यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2019 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

