EVM Tampering Row: लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्या; निवडणूक आयुक्तही जनतेने निवडावा - उद्धव ठाकरे
निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएमच्या वापराबाबत लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, असे उद्धव ठाकरेयांनी मंगळवारी म्हटले.
EVM Tampering Row: ईव्हीएमच्या (EVM) निवडणूक प्रक्रियेबाबत लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात आणि निवडणूक आयुक्तही जनतेने निवडला पाहिजे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena-UBT)यांनी मंगळवारी म्हटले. प्रसारमाध्यामांच्या प्रश्नानांना उत्तर देताना त्यांनी हे म्हटले. नागपुरात पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले की, "'एक देश, एक निवडणूक' हा मुद्दा नंतर यायला हवा. आधी निवडणूक आयुक्तांची निवडणूक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. (हेही वाचा: Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित)
जर राष्ट्रपती निवडता येतो तर निवडणूक आयुक्त का नाही? जर लोकांना ईव्हीएमबद्दल शंका असेल, तर त्यांना बॅलेट पेपरद्वारे मतदान करू द्या, नंतर कोणीही त्यावर प्रश्न विचारणार नाही. नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये महायुतीचे काही नेते नाखूश असल्याच्या वृत्तावर शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांना सरकार चालवू द्या, त्यांना कळेल. माझ्याबाबात नेहमी खोटे बोलले गेले. छगन भुजबळ माझ्या संपर्कात नसून ते नेहमीच माझ्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे ते खोटे आहे. याआधी सोमवारी काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली, त्यांनी ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता ठळकपणे मांडल्या होत्या, परंतु निवडणूक आयोगाने त्या स्वीकारल्या नाहीत. (Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण)
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने ईव्हीएमबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर शंका व्यक्त करण्यासाठी पक्षाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुती आघाडीने 235 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपसाठी हे निकाल महत्त्वाचा टप्पा ठरले. महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. (हेही वाचा:)
निवडणुकीत महायुतीने 235 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. ज्यात भाजप 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 57 आणि 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसला फक्त 16 जागा मिळाल्या. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने (यूबीटी) 20 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीने (शरद पवार गट) फक्त 10 जागा जिंकल्या.